नळदूर्ग येथे तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील मनसे कार्यकर्त्यांची बैठक ; बैठकीत आमचं ठरलं ..चा नारा.
News धाराशिव आवाज दि.१२(नळदूर्ग प्रतिनिधी)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुळजापूर विधानसभेची बैठक सोमवारी (दि.११) नळदूर्ग येथे पार पडली.तुळजापूर विधानसभेच्या निवडणूकी संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये तुळजापूर विधानसभा संदर्भात चर्चा करण्यात आले आणि मनसेची भूमिका ठरली? या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव, जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार, तालुका सरचिटणीस गणेश पाटील,नळदुर्ग शहराध्यक्ष अलीम शेख , तुळजापूर माजी शहराध्यक्ष धर्मराज सावंत ,उपाध्यक्ष अविनाश पवार , नळदुर्ग शहर सचिव प्रमोद कुलकर्णी, मनवीसे तालुकाध्यक्ष सुरज चव्हाण, मनविसे नळदुर्ग शहराध्यक्ष निखिल येडगे, नळदुर्ग शहरउपाध्यक्ष रवि राठोड, जळकोट शाखाध्यक्ष आकाश पटणे, अणदूर शाखाध्यक्ष सोमेश्वर आलुरे, मानेवाडी शाखाध्यक्ष दगडू लकडे, नंदगाव विभागाध्यक्ष योगेश मुदगडे, आदी पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते.
-----------------------------------------
मनसेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी आपली मते व्यक्त केली. शेवटी सर्वानुमते मनसेची भूमिका ठरली.मात्र ही भूमिका कोणत्याही कार्यकर्त्यांनी अद्याप तरी प्रसारमाध्यमांना दिलेली नाही. त्यामुळे मनसेची भूमिका गुलदस्त्यात आहे.