तुळजापूर : काँग्रेसकडून धीरज पाटलांना उमेदवारी ; चव्हाण परिवाराची नाराजी काँग्रेसला भोवणार का...?
News धाराशिव आवाज (लक्ष्मण नरे )
तुळजापूर विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने अखेर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड धीरज उर्फ कुलदीप अप्पासाहेब पाटील यांना उमेदवारी जाहीर केली.उमेदवारी जाहीर होताच अनेक ठिकाणी आनंद तर अनेक ठिकाणी नाराजीचे सूर पहावयास मिळत आहेत.काँग्रेस पक्षाने जरी धीरज पाटील यांना उमेदवारी जाहीर केली असली तरी या मतदारसंघावरती प्रभुत्व असलेले माजी मंत्री मधुकरराव चव्हाण साहेब यांना डावलल्याने चव्हाण परिवाराच्या नाराजीचा सामना काँग्रेसला करावा लागणार आहे. चव्हाण परिवाराची नाळ जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेशी जोडली गेल्याने माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांना डावलून धीरज पाटील यांना उमेदवारी देणे काँग्रेसला फायद्याचे ठरेल का ? हे पाहणे गरजेचे आहे.मात्र सध्या तरी चव्हाण परिवारास उमेदवारी न दिल्याने ग्रामीण भागातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पहावयास मिळत आहे.पुढील काळात काँगेस ही नाराजी कशी दूर करणारा हे पाहणे गरजेचे आहे.
चौकट -
पुत्र सुनील चव्हाण भाजप मध्ये -
युवा नेते तथा तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुनील चव्हाण हे भाजपामध्ये आहेत. युवा नेते सुनील चव्हाण यांना मानणारा मोठा युवा वर्ग तालुक्यासह जिल्ह्यामध्ये आहे.त्यांच्या शब्दावरती अनेक कार्यकर्ते काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला.या विधानसभा निवडणुकीत सुनील चव्हाण ही कोणती भूमिका घेतात पाहणे गरजेचे आहे.
चौकट -
काय आहे चव्हाण परिवाराची ताकद :
तुळजापूर सह जिल्ह्यावर ती माजी मंत्री मधुकररावजी चव्हाण साहेब यांना मानणारा मोठा वर्ग असून राजकीय क्षेत्रासह सहकार शिक्षण या क्षेत्रावरतीही चव्हाण परिवाराचे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वर्चस्व आहे त्यांचे पुत्र सुनील चव्हाण हे तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्याची विद्यमान चेअरमन असून दुसरे पुत्र बाबुराव चव्हाण हे बालाघाट शिक्षण संस्थेचे संचालक आहेत.या सोबतच श्री खंडोबा पण आणि सहकारी संस्था जीवन विकास शिक्षण संस्था यासह छोट्या-मोठ्या उद्योगामुळे चव्हाण परिवाराला मानणारा मोठा वर्ग तालुक्यात आहे या निवडणुकीमध्ये चव्हाण परिवार कोणती भूमिका घेणार हे पाहणे गरजेचे आहे मात्र चव्हाण परिवाराला डावल्यामुळे सध्या तरी कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर दिसून येत आहे.
चौकट -
अनेक कार्यक्रमातून चव्हाण यांना डावलण्यात आले होते -
जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्ह्यात अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्यात आले. मात्र या कार्यक्रमांना माजी मंत्री मधुकरराव चव्हाण व चव्हाण परिवारातील जिल्हा परिषद सदस्य बाबुराव चव्हाण,युवक काँग्रेस कमिटीचे सचिव अभिजित चव्हाण यांना अनेक ठिकाणी निमंत्रण देण्यात आले नव्हते तर महाविकास आघाडीने तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये घेतलेल्या मेळाव्याच्या बॅनर वरती माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचा फोटो घेणे टाळले होते.याचा फटका आता महाविकास आघाडीला बसणार का हे पाहणे गरजेचे आहे.?