Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तिसऱ्या आघाडी कडून अण्णासाहेब दराडे ' बॅट ' घेऊन मैदानात..!

तिसऱ्या आघाडी कडून अण्णासाहेब दराडे ' बॅट ' घेऊन मैदानात..!


News धाराशिव आवाज दि.२९ ऑक्टोबर 


महायुती व महाविकास आघाडी पाठोपाठ तिसऱ्या आघाडीने तुळजापूर विधानसभेसाठी तगडा उमेदवार रिंगणात उतरवल्याने तिरंगी लढतीची शक्यता नाकारता येत नाही. मंगळवारी दि.२९ रोजी तिसऱ्या आघाडीकडून म्हणजेच प्रहार जनशक्ती पक्षाकडून अण्णासाहेब दराडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अण्णासाहेब दराडे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करीत महायुतीचे उमेदवार आमदार राणाजगजीतसिंह पाटील व महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज पाटील यांना मोठे आव्हान दिले आहे. 
अण्णासाहेब दराडे हे तुळजापूर विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर झाले असून त्यांचे निवडणूक चिन्ह ' बॅट 'असणार आहे. दराडे ' बॅट ' घेऊन कोणाला सिक्सर व कोणाला चौकार मारणार हे पाहणे गरजेचे आहे. दराडे यांच्या पाठीमागे छत्रपती संभाजीराजे, शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांचे पाठबळ असणार आहे. या मोठ्या नेत्यांच्या पाठबळामुळे या भागात शेतकरी संघटना, स्वराज्य पक्ष व प्रहार जनशक्ती पक्ष या पक्षाचे असंख्य कार्यकर्ते असून ते कार्यकर्ते पुढील काळात अण्णासाहेब दराडे यांच्यासाठी काम करणार आहेत.त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीच्या कोणत्या उमेदवाराचे अण्णासाहेब दराडे हे विकेट घेणार हे पाहणे गरजेचे आहे. 
तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील जवळपास ७५ टक्के मतदार संघ अण्णासाहेब दराडे यांनी आपल्या यात्रेच्या माध्यमातून पिंजून काढला आहे.त्यांच्या यात्रेचा फायदा या निवडणुकीमध्ये नक्कीच दराडे यांना होणारे आज शंका नाही. अण्णासाहेब दराडे यांच्या तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारीमुळे आमदार राणाजगजितसिंह पाटील व धीरज पाटील यांची डोकेदुखी वाढली असून तिसऱ्या आघाडीने प्रभावशाली उमेदवार दिल्याने महाआघाडी व महायुती या दोन्हीच्या मध्ये तिसऱ्या आघाडीचा उमेदवार प्रभावी ठरतो का हे पाहणे गरजेचे आहे. मंगळवारी दराडे यांनी आपले मोठे शक्ती प्रदर्शन तुळजापूर येथे दाखवून दोन्हीही प्रतिस्पर्धी उमेदवारांना मोठे आवाहन उभे केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.