Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तुळजापूर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारांकडून ८७ अर्ज दाखल..!

तुळजापूर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारांकडून ८७ अर्ज दाखल..!


News धाराशिव आवाज दि.२९ ऑक्टोबर 


धाराशिव जिल्ह्यातील  तुळजापूर विधानसभा (२४१) मतदारसंघात शेवटच्या दिवशी मंगळवारी (दि.२९) ५४ उमेदवाराच्या एकूण ८७ आले आहेत.आज शेवट दिवसा पर्यंत भाजपा कडून राणाजगजितसिंह पाटील, काँग्रेस कडून धीरजपाटील, बहुजन वंचित आघाडी कडून डॉ स्नेहाताई सोनकाटे,तिसऱ्या आघाडी कडून अण्णासाहेब दराडे, समाजवादी पार्टीकडून देवानंद रोचकरी, मराठा आरक्षण योद्धा मनोज जरंगे - पाटील यांच्याकडून सज्जनराव साळुंके, महंत तुकोजी बुवा हे दोन अर्ज दाखल झाले आहेत. समाजवादी पार्टीकडून अमीर शेख,सत्यवान सुरवसे,डॉ सिद्धेश्वर जाधव,अपक्ष उमेदवार म्हणून अनिता साळुंके अपक्ष,नवनाथ उळेकर अपक्ष, अँड. पूजा देडे अपक्ष, तानाजी पिंपळे अपक्ष,व्यंकट गुंड, संतोष दूधमाते,काकासाहेब राठोड अपक्ष,
योगेश केदार अपक्ष ,नागटिळे भैय्यासाहेब अपक्ष, प्रल्हाद संगर अपक्ष यांनी उमेदवारी दाखल केले.
एकूण ५४ उमेदवाराचे ८७ अर्ज दाखल झाले अशी माहिती निवडणूक अधिकारी यांनी दिली  आहे. दि. ४ नोव्हेंबर पर्यत अर्ज माघार घेणे असल्याने ४ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक रिंगणात किती उमेदवार असणार पाहणे गरजेचे आहे.

चौकट -
शेवटच्या दिवशी काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण व राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाचे अशोक जगदाळे यांनी ही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.