Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल 


News धाराशिव आवाज दि.२८ ऑक्टोबर 


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक भाऊ जगदाळे यांनी.आज सोमवारी (दि.२८) रोजी अपक्ष फॉर्म भरून विधानसभेच्या रिंगणात उडी घेतली आहे.मागील काही दिवसात अशोक जगदाळे यांनी गावोगावी शेतकरी मेळावा,युवकांना रोजगार मेळावा,होम मिनिस्टर या पैठणीच्या खेळाच्या माध्यमातून गावोगावी जनसंपर्क व ताकद निर्माण केली होती. यासह अनेक गावांमध्ये कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन विधानसभेसाठी वातावरण निर्मिती केली होती.असे असताना अशोक जगदाळे यांना काँग्रेस किंवा शिवसेनेस जागा सुटल्यास शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार असे निश्चित मानले जात होते.मात्र अचानक काँग्रेसने तुळजापूर विधानसभेसाठी धीरज पाटील यांची उमेदवारी जाहीर करून धक्कातंत्र दिले.लोकसभेच्या काळामध्ये अशोक जगदाळे यांनी शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना सर्व ताकतीने मदत केली होती.या विधानसभेमध्ये अशोक जगदाळे यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती.मात्र येथील जागा काँगेस पक्षास मिळाल्याने अशोक जगदाळे यांना अपक्ष उमेदवारी भरावी लागली.पुढील काळात अशोक जगदाळे यांची भूमिका काय राहते ते पाहणे गरजेचे आहे.अशोक जगदाळे हे तिसऱ्या आघाडी, मनसे की आपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवतात की इतर कोणता पर्याय निवडतात हे पाहणे गरजेचे आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.