राणाजगजितसिंह पाटील,कुलदीप पाटील,देवानंद रोचकरी आणि आण्णासाहेब दराडे यांच्यात चौरंगी लढत ; आता २३ उमेदवार रिंगणात
News धाराशिव आवाज दि.४
राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे.२४१ तुळजापूर विधानसभा मतदारसंघात एकूण २३ उमेदवार रिंगणात आहेत.सोमवारी (दि.४) रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटच्या दिवशी ५१ पैकी २८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.यात माजी मंत्री मधुकरराव चव्हाण,अशोक जगदाळे,जीवन गोरे,सुधीर पाटील,व्यंकटराव गुंड,तुकोजी महंत, सज्जनराव साळुंके या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.तुळजापूर विधानसभा निवडणुकीत २३ उमेदवार रिंगणात आहेत.या मध्ये प्रामुख्याने महायुतीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील व महाविकास आघाडीच उमेदवार कुलदीप पाटील,समाजवादी पार्टीचे देवानंद रोचकरी तसेच तिसऱ्या आघाडीचे अण्णासाहेब दराडे यांच्यासह बाकी १९ उमेदवार अपक्ष असून यात वंचित आघाडी डॉ स्नेहलता सोनकाटे,दत्तात्रय कदम,पूजा देडे,अमिर शेख,उज्वला गाटे,योगेश केदार,तात्यासाहेब रोडे, तांबोळी शब्बीर, धनंजय पाटील, धीरज पंडित पाटील,भैय्यासाहेब नागटिळे, शरद हरिदास पवार,सचिन शेंडगे, अमेर सरदार शेख,काकासाहेब राठोड,धनाजी हुंबे, मनसुफ शेख,गणेश रोचकरी, सत्यवान सुरवसे इत्यादी उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने कौल देते हे पाहणे गरजेचे आहे.