News धाराशिव आवाज (लक्ष्मण नरे)
.....अखेर विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि भाजपाने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची पुन्हा एकदा महायुतीचा तुळजापूर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केला...जाहीर झाल्यानंतर पाटील यांचा दादा रथ तुळजापूर तालुक्यात मोठ्या जोमाने फिरत आहे.पाटील यांच्या दादा या रथाला कोण थांबवणार ? याची चर्चा ग्रामीण भागात रंगली आहे.
. मागील विधानसभेत राणादादा पाटील यांनी धाराशिव मतदार संघ सोडून तुळजापूर मतदारसंघ निवडला आणि या मतदारसंघात त्यांनी जोरदार विजय मिळवला.यामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणारा हा मतदारसंघ प्रथमच भारतीय जनता पार्टीच्या हातात गेला.त्यामुळे या बालेकिल्ल्यावरती पुन्हा काँग्रेस आपली सत्ता स्थापन करण्यासाठी साहेब की भाऊ यांना मैदानात उतरणार हे पाहणे गरजेचे आहे. . सध्या तरी हा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे आहे मात्र भविष्यात हा मतदार संघ शिवसेनेकडे जाणार ? की राष्ट्रवादी काँग्रेस कडे जाणार ? हे सांगता येत नाही.काँग्रेसकडे हा मतदारसंघ असल्याने या मतदारसंघावरती माजी मंत्री मधुकरराव चव्हाण साहेब,राष्ट्रवादीचे नेते अशोक भाऊ जगदाळे,देवानंद भाऊ रोचकरी व धीरज पाटील साहेब यांनी तिकिटासाठी जोर धरला आहे.मात्र आमदार राणा पाटील यांचा रथ रोखण्यासाठी काँग्रेसकडून साहेब की भाऊ यांच्यापैकी कोणाला मैदानात उतरतात हे पाहणे गरजेचे असणार आहे.?
इतरांचे मोठे आवाहन -
या प्रमुख लढती सोबतच इतर पक्ष व अपक्ष यांचे मोठे आव्हान या पक्षांसमोर असणार आहे.यामध्ये बहुजन वंचित आघाडीच्या डॉ स्नेहलता सोनकाटे, अर्धा मतदार संघ पिंजून काढलेले व सुसाट सुटलेले शेतकरी पुत्र अपक्ष उमेदवार अण्णासाहेब दराडे यांच्यासह इतर छोट्या-मोठ्या पक्षांचे उमेदवार. त्याचबरोबर मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे - पाटील साहेब यांच्या वतीने कोण उमेदवार मैदानात उतरणार ? हेही पाहणे गरजेचे आहे.
एकंदरीतच तुळजापूर विधानसभेवरती महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी जरी प्रमुख लढत असली तरी अपक्षांची डोकेदुखी या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना असणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये सध्या आमदार राणा दादा पाटील यांचा रथ रोखण्यासाठी भाऊ की साहेब याच्यावरती जोरदार चर्चा सुरू आहे....
- लक्ष्मण नरे...