जळकोट : शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने धनराज रेणुके यांचा सत्कार
जळकोट,प्रतिनिधी दि.२५ ऑक्टोबर
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील संभाजीनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. धनराज रेणुके हे ३५ वर्ष ५ महिन्याच्या शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त दिवाळी सुट्टीपूर्वी शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने मान्यवरांच्या उपस्थितीत सपत्नीक सत्कार करण्यात आला.संभाजीनगर शाळेचे मुख्याध्यापक श्री. धनराज रेणुके यांनी आपल्या शिक्षण क्षेत्रातील सेवेत अठरा वर्ष मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावली आहे. संभाजीनगर शाळेत विविध उपक्रमाच्या माध्यमातून शाळेचा विकास केला आहे. शाळा आयएसओ करण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. सेवानिवृत्ती निमित्त एका खास कार्यक्रमात शाळेच्या पटांगणावर सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार हे होते. या कार्यक्रमात श्री.धनराज रेणुके व सौ. रमाबाई रेणुके यांचा पूर्ण आहेर , राजे शिवछत्रपती यांची प्रतिमा , फेटा, शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात जळकोट येथील मेघराज किलजे यांना पुणे येथील युवा प्रबोधन साहित्य मंच, महाराष्ट्र राज्याचा आदर्श समाजरत्न भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तालुका शिक्षक संघटनेचे नेते श्री. डी. डी. कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रेणुके यांच्या सेवानिवृत्तीबद्दल शाळेचे विद्यार्थी कु. प्रीती परमेश्वर भोगे, ऋतुजा राम बंडगर, शिवकन्या हनुमंत अंगुले , गौरी मोहन चौगुले, सुफियान अफजलपुरे या विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रमास माजी गटशिक्षणाधिकारी बेशकराव, जळकोटचे शिक्षण विस्तार अधिकारी जट्टे, माजी शिक्षण विस्तार अधिकारी वाघमोडे, शिवजन्मोत्सव समितीचे ब्रह्मानंद कदम, प्रयाग मल्टीस्टेटचे चेअरमन सचिन कदम, ग्रामपंचायत सदस्य संजय अंगुले, ग्रामपंचायत सदस्य संजय माने, शिक्षक संघटनेचे जिल्हा प्रवक्ते उमेश भोसले, होर्टी केंद्रप्रमुख महाबोले, माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शकील मुलानी, सौ. सरिता कदम, औसा येथील कुमार स्वामी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. घोगरे, श्रीकांत उबाळे, होर्टी केंद्रीय मुख्याध्यापक सरवदे, शिक्षक सोसायटीचे माजी चेअरमन प्रशांत मिटकर, पार्वती कन्या प्रशालेचे विजयकुमार मोरे, अभिमन्यू कदम, राजेंद्र जट्टे, समीर जाधव, विक्रम पाचंगे, प्रदीप तरमोडे, नागराज पोतदार, एस. व्ही .भोसले, सौ . महानंदा महामुनी,आहेरकर, मंगेश सुरवसे आदि मान्यवर शाळेतील शिक्षक, सहशिक्षिका, व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.