तुळजापूर : गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या वाढदिवसानिमित्त ५१ जणांचे रक्तदान
तुळजापूर, प्रतिनिधी (लक्ष्मण नरे)
जगाला शांतीचा संदेश देणारे अध्यात्मिक गुरु,गुरुदेव श्री श्री रविशंकर जी यांच्या वाढदिवसानिमित्ताने आर्ट ऑफ लिंक परिवार तुळजापूर व सह्याद्री ब्लड बँक धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला. श्री श्री रविशंकर गुरुजी यांचा जन्मदिवस प्रतिवर्षी तुळजापूर येथे रक्तदान शिबिर घेऊन साजरा केला जातो. या निमित्ताने सुमेरू हाल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी आर्ट ऑफ लिंक परिवारातील प्रशिक्षक व युवाचार्य यांनी परिश्रम घेतले.यावेळी डॉ राहुल पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.