खुदावाडीत बसव जयंती निमित्त बैलजोडी स्पर्धा
अणदूर, प्रतिनिधी दि.१२ (लक्ष्मण नरे)
तुळजापूर तालुक्यातील आदर्श गाव खुदावाडी येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त रविवारी (दि.१२) सकाळी बैलजोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यात गावातील ११ बैलजोडींनी सहभाग घेतला होता.शेतकरी बांधवांनी बैलजोडी रंगवून गावातून हलगी लावून मिरवणूक काढण्यात आली. बैलजोडी स्पर्धेत संभाजी महादेव कापसे यांच्या बैलजोडीस प्रथम,शिवानंद माणिक घोडके द्वितीय,दत्तात्रय पांडुरंग थावरे तृतीय,प्रवीण उत्तम जाधव उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले.तर बैलजोडी स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व बैलजोडीस ५ किलो शेंगा पेंड व बैल मालकाचा टॉवेल टोपी देवून सत्कार करण्यात आला.
बैलजोडी स्पर्धा भरविण्यासाठी बसवेश्वर जन्मोत्सव कमिटीचे अध्यक्ष दत्तात्रय टिकबरे,उपाध्यक्ष भास्कर व्हलदुरे,राम जवळगे,ओंकार कबाडे,शिवराज कबाडे यांच्यासह जन्मोत्सव समितीचे सर्व युवक बांधव व गावातील प्रतिष्ठित नागरिक माजी सरपंच रेवणसिद्ध स्वामी आप्पा,डॉ मनोज कबाडे, माजी प.स महादेव सालगे,ग्रा.प सदस्य महेश्वर बोंगरगे,चेअरमन अमोल नरवडे,भिमाशंकर कबाडे,गुरुनाथ कबाडे,संगमेश्वर पाटील,धनराज सालगे,महादेव दिगंबर कबाडे,सोमनाथ पाटील,निखिल नरवडे,किरण घोडके,संजय कबाडे, सिद्धारूढ कबाडे, सिद्धेश्र्वर पाटील,प्रभाकर कबाडे, सिद्धेश्र्वर ढेंबरे,दत्ता थावरे,बापू सुरवसे,नितीन बोंगरगे,वैभव सांगवे आदींची उपस्थिती होती.
राज्यस्तरीय खुल्या नृत्य स्पर्धा -
रविवार दि.१९ रोजी जन्मोत्सव समितीच्या वतीने भव्य राज्यस्तरीय खुल्या नृत्य स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.यात सामूहिक,युगल व वैयक्तीक नृत्य स्पर्धा होणार आहेत तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.