Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शहीद जवान मेजर सतीश नागनाथ बाबर यांच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

शहीद जवान मेजर सतीश नागनाथ बाबर यांच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 



अणदूर, प्रतिनिधी (लक्ष्मण नरे) दि.२२ ऑक्टोबर 


तुळजापूर तालुक्यातील गुळहळ‌्ळी येथील शहीद जवान मेजर सतीश नागनाथ बाबर यांच्या स्मरणार्थ गुळहळ‌्ळी कै.सतीश बाबर मित्र परिवार व ग्रामस्थांच्या वतीने सोमवारी दि.२८ रोजी एसबी चषकचे आयोजन करण्यात आले आहे. 
या भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट हाफ पीच स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक महादेव नागनाथ बाबर यांच्या वतीने रू.२५ हजार,शेतकरी जुबेर पटेल यांच्यावतीने द्वितीय पारितोषिक रु.१२५११, तर तानाजी बनछेरे यांच्या वतीने ७०००  तृतीय बक्षीस देण्यात येणार आहे. तर कै.विनायक दत्तात्रय निकम यांच्या स्मरणात चषक देण्यात येणार आहे.यासह विविध बक्षिसे या क्रिकेट स्पर्धेमध्ये ठेवण्यात आली असून जास्तीत जास्त संघांनी सहभागी होण्याचे आवाहन बालाजी बाबर,धीरज निकम,सोमनाथ लांडगे,तानाजी बाबर,शिवराज बिराजदार,अतुल निकम,प्रवीण बिराजदार यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.