Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राज्यातील पहिली ' बसवसृष्टी ' नळदुर्गमध्ये साकारणार ; ५ कोटीचा निधी मंजूर


राज्यातील पहिली ' बसवसृष्टी ' नळदुर्गमध्ये साकारणार ; ५ कोटीचा निधी मंजूर


           अणदूर प्रतिनिधी दि.२२ ऑक्टोबर 


तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे राष्ट्रीय महामार्ग ६५ वरील नळदुर्ग - अणदूर दरम्यान महाराष्ट्र राज्यातील पहिली बसवसृष्टी साकारली जाणार असून आज नियोजित जागेवर 'बसवसृष्टी' स्तंभ पूजन कार्यक्रम समाज बांधवांच्या उपस्थित मंगळवारी (दि.२२) मोठ्या उत्साहात संपन्न झाला.तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भेट देवून स्तंभाचे व महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे  दर्शन घेतले.

 मंगळवारी राज्य सरकारने विशेष बाब म्हणून नळदुर्ग पालिकेची स्मारकासाठी देऊ असलेल्या ६ एकर जागेच्या आरक्षण बदलाचा निर्णय घेतला होता. यापूर्वीच ५ कोटी रूपयांचा निधी बसवसृष्टीसाठी उपलब्ध झालेला आहे. सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून लवकरच राज्यातील पहिली भव्यदिव्य आणि आकर्षक बसवसृष्टी आकाराला येणार असल्याची माहिती माजी सभापती तथा तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दीपक आलुरे यांनी समाज बांधवांना दिली.पुढे बोलताना म्हणाले की,लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यासाठी आणखी निधीची आवश्यकता भासल्यास तो उपलब्ध करून देण्यासाठीही सरकार दरबारी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव वडगावे, कोरे,बसवराज धरणे,आपू जेवळे,संजय बताले,सिद्धेश्वर कोरे,राज पाटील,महादेव पाटील,सोमनाथ शेटे,सुभाष कोरे,विजयानंद वर्दे,दयानंद मूडके,प्रकाश स्वामी,दयानंद स्वामी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.