Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

लोकमाता शांताबाई आलुरे यांच्या स्मरणार्थ मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

लोकमाता शांताबाई आलुरे यांच्या स्मरणार्थ मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन 


News धाराशिव आवाज दि. १६



तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथील सिद्धी हॉस्पिटल यांच्या वतीने कै. लोकमाता शांताबाई (काकी) सिद्रामप्पा आलुरे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शनिवार दि.१९ रोजी सकाळी १० ते १ या वेळेत  सर्वरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
माजी आमदार,शिक्षण महर्षी स्व. सि. ना आलुरे गुरुजी यांच्या धर्मपत्नी स्व.सौ शांताकाकी आलुरे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त ईटकळ येथील सिद्धी हॉस्पिटल यांच्या वतीने तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात ब्लड प्रेशर, शुगर या सह इतर सर्व छोट्या-मोठ्या आजाराची तपासणी मोफत करण्यात येणार आहे तरी इटकळ व परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचे लाभ घेण्याच्या आवाहन माजी प्राचार्य संगमेश्वर जळकोटे,डॉ अंकिता साईनाथ जळकोटे यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.