अजय अणदूरकर म्हणजे सर्व क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व - डॉ जितेंद्र कानडे
---------------------------------------
ज्येष्ठ पत्रकार अजय अणदूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पुस्तके,अंगणवाडी यांना घड्याळाचे वाटप
अणदूर,प्रतिनिधी दि.१६ ऑक्टोबर
अणदूरसह पंचक्रोशीत जेष्ठ पत्रकार व फार्मासिस्ट म्हणून सुप्रसिद्ध असणारे अजय उर्फ श्रीकांत अणदूरकर यांचा वाढदिवस ८ फार्मा,जय मल्हार पत्रकार संघ, खडकाळी मॉर्निंग ग्रुप,पौर्णिमा महिला बहुउद्देशिय सेवाभावी संस्था यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण घोडके पाटील हे होते तर यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना नेते जितेंद्र कानडे, उपसरपंच डॉ नागनाथ कुंभार, ज्येष्ठ पत्रकार दयानंद काळुंके, पोर्णिमा महिला संस्थेच्या संस्थापिका सुजाता चव्हाण, फार्मासिस्ट जीवन मोजके यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ कानडे म्हणाले की,अजय अणदूरकर या व्यक्तिमत्व आरोग्य क्षेत्र राजकारण उद्योगधंदे यासह पत्रकारिता क्षेत्रांमध्ये आदर्श व्यक्तिमत्व आहे या व्यक्तिमत्त्वाचे गुण अनेकांनी अंगी करावे असे असून या व्यक्तिमत्त्वामुळे सर्व राजकीय पक्षातील व सर्व जाती धर्मातील मित्र अजय अणदूरकर यांनी जपले आहेत. त्यांचा हा गुण इतरांनी घेण्यासारखा असून त्यांच्या आदर्श व्यक्तिमत्वास यानिमित्त शुभेच्छा देत असल्याचे सांगितले. यावेळी डॉ नागनाथ कुंभार, बाळकृष्ण घोडके - पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सकाळी खडकाळी ग्रुप यांच्या वतीने अणदूर - खुदावाडी रस्त्यावरती वृक्षारोपण करण्यात आले. खुदावाडी येथील विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. तर खडकाळी मॉर्निंग ग्रुप च्या वतीने बाजार मैदान येथे यांचा जंगी सत्कार करण्यात आला.
सायंकाळी पौर्णिमा महिला संस्था येथे ८ फार्मा ग्रुप यांच्या वतीने गावातील १५ अंगणवाड्यांना घड्याळाचे वाटप करण्यात आले. तर खुदावाडी येथे आदर्श शिक्षक सचिन गुड्ड यांच्या वतीने श्यामची आई या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.८ फार्मा ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ एम बी बिराजदार यांनी आभार सुजाता चव्हाण यांनी मानले.