Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दराडे पती - पत्नी निवडणूकीच्या मैदानात ; होम टू होम प्रचार --२० टीम मैदानात ; दोन दिवसात ७६ गावे पूर्ण

दराडे पती - पत्नी निवडणूकीच्या मैदानात ; होम टू होम प्रचार  
-----------------------------------------------
२० टीम मैदानात ; दोन दिवसात ७६ गावे पूर्ण


News धाराशिव आवाज दि.१२ नोव्हेंबर


प्रहार जनशक्ती पक्षाची अधिकृत उमेदवार अण्णासाहेब दराडे यांनी दोन दिवसांमध्ये ७६ गावांमध्ये प्रत्येक घराघरात जाऊन मतदारांना भेटीगाठी घेऊन जंजावाती प्रचार सुरू केलेला आहे. ज्या हक्काने मत मागायला आलोय त्याच हक्काने पुढील काळात तुमची कामे करण्यासाठी सुद्धा तुमच्या दारात येईन असा शब्द प्रत्येक घराघरात प्रत्येक दारात जाऊन अण्णासाहेब दराडे मतदारांना देत आहेत.
दोन दिवसांमध्ये ढेकरी,शिराढोण,अमृतवाडी, मसला खुर्द, दहिवडी ,काठी ,सावंतवाडी, खुंटेवाडी, वानेवाडी, सावरगाव ,केमवाडी ,जळकोटवाडी, वडगाव काटी, तामलवाडी ,पिंपळा बुद्रुक ,पिंपळा खुर्द ,देवकुरुळी, धोत्री, सुरतगाव, मगर सांगवी ,मांजरवाडी, माळुंब्रा, कदमवाडी, गोंधळवाडी, कुंभारी इत्यादी ३० गावांना अण्णासाहेब दराडे यांनी घरोघरी भेट दिलेली आहे.
तर दुसरीकडे अण्णासाहेब दराडे यांच्या पत्नी ज्योती दराडे यांनी दोन दिवसात १५ गावाना भेट देत अण्णासाहेब दराडे ज्याप्रमाणे गावोगावी घरोघरी प्रत्येक मतदारापर्यंत त्यांच्या दारापर्यंत पोहोचून मतदारांना मतदान करण्याची विनंती करत आहेत अगदी त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी ज्योती दराडे या सुद्धा गेले दोन दिवसांमध्ये पंधरा गावांमध्ये घरोघरी प्रचार घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत.
अण्णासाहेब दराडे यांच्या आई आशाबाई दराडे यांनी गेली दोन दिवसांमध्ये वेगवेगळ्या दहा गावांना भेटी देऊन घरोघरी  जाऊन प्रचार करत असून सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराला आपण आशीर्वाद द्यावा अशी विनंती करत आहेत.अण्णासाहेब दराडे यांचे भाऊ आनंद दराडे यांनी २१ गावांना भेटी देऊन प्रचारात ताकत निर्माण केली आहे.
अण्णासाहेब दराडे यांचे पूर्ण कुटुंबच प्रचार यंत्रणेमध्ये पूर्णपणे ताकतीने सहभागी झाले असून आई , पत्नी , भाऊ चुलत भाऊ , मामाची मुलं , मावस भाऊ मित्र सर्व पूर्ण परिवार ताकतीने उतरला आहे. मतदारसंघांमध्ये वेगवेगळ्या २० टीम तयार सक्रिय झालेल्या असून प्रत्येक टीम गावगावी जाऊन होम टू होम प्रचार ताकतीने करत प्रत्येक मतदारापर्यंत मतदाराच्या घरापर्यंत जाऊन अण्णासाहेब दराडे यांचं बॅट हे चिन्ह पोहोचवत आहेत.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.