News धाराशिव आवाज दि.१० नोव्हेंबर
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडी पाठोपाठ तिसऱ्या आगाडीने तुळजापूर विधानसभेसाठी तगडा उमेदवार रिंगणात उतरवल्याने तिरंगी लढत दिसून येत आहे.प्रहार जनशक्ती पक्षाकडून अण्णासाहेब दराडे यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे.गावोगावी,खेडोपाडी, तांडा वड्या वस्त्यांवरील वारे दराडे यांच्या बाजूने फिरताना दिसून येत आहे.तालुक्यात अण्णासाहेब दराडे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करीत महायुतीचे उमेदवार आमदार राणाजगजीतसिंह पाटील व महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज पाटील यांना मोठे आव्हान दिले आहे.
अण्णासाहेब दराडे हे तुळजापूर विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीचे अधिकृत उमेदवार असून त्यांचे निवडणूक चिन्ह ' बॅट ' आहे. दराडे ' बॅट ' घेऊन कोणाला सिक्सर व कोणाला चौकार मारणार हे पाहणे गरजेचे आहे. दराडे यांच्या बॅट ने कोणाची विकेट जाते हे २३ तारखेला कळणार आहे दराडे यांच्या पाठीमागे छत्रपती संभाजीराजे, शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांचे पाठबळ आहे. या मोठ्या नेत्यांच्या पाठबळामुळे या भागात शेतकरी संघटना, स्वराज्य पक्ष व प्रहार जनशक्ती पक्ष या पक्षाचे असंख्य कार्यकर्ते असून ते कार्यकर्ते व अण्णासाहेब दराडे यांची प्रभावी प्रचार यंत्रणा यामुळे दराडे सद्या तरी तिसऱ्या क्रमांकवर आहेत.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील जवळपास ९० टक्के मतदार संघ अण्णासाहेब दराडे यांनी आपल्या यात्रेच्या माध्यमातून पिंजून काढला आहे.त्यांच्या यात्रेचा फायदा या निवडणुकीमध्ये नक्कीच दराडे यांना होणारे आज शंका नाही. अण्णासाहेब दराडे यांच्या तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारीमुळे आमदार राणाजगजितसिंह पाटील व धीरज पाटील यांची डोकेदुखी वाढली असून तिसऱ्या आघाडीने प्रभावशाली उमेदवार दिल्याने महाआघाडी व महायुती या दोन्हीच्या मध्ये तिसऱ्या आघाडीचा उमेदवार प्रभावी ठरतो का हे पाहणे गरजेचे आहे.दराडे यांचे प्रभावी वक्तृत्व व जनमानसात असलेल्या त्यांचा साधेपणा आज अनेकांना भावतो आहे.प्रचारात तिसऱ्या क्रमांकावर असलेली बॅट आता मतदान यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.त्यामुळे दोन्ही आघाडी व युती यांच्या पाठोपाठ तिसऱ्या आघाडीने सद्या तरी मोठा प्रतिसाद मिळत असल्याने तिसऱ्या क्रमांकावर दिसून येत आहे.