जळकोट : संत गोरोबा काका पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजन
जळकोट, प्रतिनिधी दि.४(मेघराज किलजे)
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील मानमोडी - जळकोट रोडवर असलेल्या श्री संत गोरोबाकाकांच्या ७०७ व्या पुण्यतिथीनिमित्त मंदिर समितीच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
संत गोरोबाकाका यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोरोबाकाका मंदिरात रविवार(दि.५) रोजी रात्री नऊ ते अकरा या वेळेत सारोळा(ता. बार्शी) येथील ह. भ. प. उत्तम महाराज गाटे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. सोमवार(दि.६) रोजी गोरोबाकाकांच्या मूर्तीचे पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी एक वाजता गुलाल उधळण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास जळकोट व परिसरातील भाविक भक्तांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा.असे आवाहन संत गोरोबा काका मंदिर समितीचे भीमाशंकर कुंभार यांनी केले आहे.