Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय बंजारा संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी शिवाजी राठोड

राष्ट्रीय बंजारा  संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी शिवाजी राठोड  


      जळकोट, प्रतिनिधी दि.४(मेघराज किलजे)


  जळकोट येथून जवळच असलेल्या आलियाबाद  येथील रहिवाशी व सध्या मुंबई येथे डीएचसीचे चीप फायनान्स ऑफिसर या पदावर कार्यरत असलेले ,   मुंबई जनरल कामगार सभेचे जनरल सेक्रेटरी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व्हीजेएनटी सेलचे माजी सरचिटणीस शिवाजी भील्लू राठोड  यांची राष्ट्रीय बंजारा परिषद संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
शिवाजी भिल्लू राठोड हे गेल्या अनेक वर्षापासून बंजारा समाजाच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी ते नेहमी सहकार्य करीत असतात. त्यांनी गोरधर्म प्रचार व प्रसार गरजू कुटुंबीयांना मोफत उपचार , जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून पिढीत कामगारांना न्याय मिळवून देण्याचे सतत प्रयत्न यासह विविध सामाजिक कार्य करीत असतात . त्यांच्या एकंदरीत कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय बंजारा परिषद, राष्ट्रीय समन्वयक श्री. किसन राठोड, राष्ट्रीय बंजारा परिषद राष्ट्रीय अध्यक्ष,  श्री. विलास  राठोड, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयकुमार  राठोड , राष्ट्रीय प्रवक्ता गोर प्रकाश  राठोड, मधुकर जाठोत यांच्या आदेशाने  सदर निवड करण्यात आली आहे. गोर बंजारा समाजाच्या सामाजिक , शैक्षणिक, सांस्कृतिक , साहित्यिक , धार्मिक , आर्थिक व राजकीय समस्या सोडवण्यासाठी कार्यरत राहून राष्ट्रीय बंजारा परिषद संघटना मजबूत करण्यासाठी ते सतत धडपड करीत असतात . त्यांच्या या निवडीबद्दल राष्ट्रीय बंजारा परिषद संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक , गोर धर्मनेता तथा उद्योगपती किसन  राठोड यांनी शिवाजी राठोड यांचा निवडीबद्दल  सन्मान केला . त्यांच्या या निवडीबद्दल धाराशिव जिल्हा, आलियाबाद, जळकोट परिसरातील विविध संघटना मित्र परिवाराकडून त्यांचे अभिनंदन  करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.