Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आमदार राणा पाटलांचा तालुक्यात झंजावात ; ग्रामीण भागात बैठकावर दिला जोर..!---बैठकांना महिलांची लक्षणीय उपस्थिती

आमदार राणा पाटलांचा तालुक्यात झंजावात ; ग्रामीण भागात बैठकावर दिला जोर..!
-------------------------------------
बैठकांना महिलांची लक्षणीय उपस्थिती 


News धाराशिव आवाज दि.५ नोव्हेंबर 


महायुतीचे अधिकृत उमेदवार राणाजगजीतसिंह पद्मसिंह पाटील यांनी संपूर्ण विधानसभा मतदारसंघात बैठकावरती मोठ्या प्रमाणावर भर दिला आहे.राणा पाटील यांच्यासह त्यांचे पुत्र मल्हार पाटील,पत्नी अर्चनाताई पाटील यांनी तालुक्यातील गावोगाव मध्ये सध्या बैठकांचा सपाटा लावल्याने ग्रामीण भागातील वातावरण ढवळून निघाले आहे.पाटील कुटुंबाच्या या झंजावाताला ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळत असून राणा पाटील व पाटील कुटुंबीय हे तालुक्यात केलेल्या विकास कामाच्या जोरावरती जनतेसमोर जात आहेत. 
गावोगावी लावलेल्या बैठकांमध्ये महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसून येत असल्याने यंदा पाटील यांना महिलांचा मोठा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रचारात महिलांनी आघाडी घेतल्याने पाटील यांचा प्रचार ग्रामीण भागामध्ये जोरात सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.