Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पोलीस हक्क संरक्षण संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी अनिता लष्करे

पोलीस हक्क संरक्षण संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी अनिता लष्करे


जळकोट, प्रतिनिधी दि.१(मेघराज किलजे)


तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील सामाजिक कार्यकर्त्या अनिता लष्करे यांची अखिल भारतीय पोलिस हक्क संरक्षण संघटनेच्या तुळजापूर तालुका महिला अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.सौ. कांताबाई बाबुराव इंदुरकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, कंधार संचलित अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षण संघटनेच्या तुळजापूर तालुका महिला अध्यक्षपदी निवडीचे पत्र  अनिता लष्करे यांना एका कार्यक्रमात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास इंदुरकर व संघटनेचे राज्य संघटक दिनकर कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आले. या निवडीबद्दल अनिता लष्करे यांचा संघटनेच्यावतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.