Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

निलेगाव येथे खरीप हंगाम बैठक

निलेगाव येथे खरीप हंगाम बैठक                      


जळकोट, प्रतिनिधी दि.१५(मेघराज किलजे)


 निलेगाव (ता. तुळजापूर) येथे खरीप हंगामपूर्व बैठक आयोजित करण्यात आली होती.  त्यामध्ये प्रामुख्याने माती नमुने काढणे , जमिनीनुसार वाणांची निवड करणे,बीज प्रक्रिया, घरगुती सोयाबीन बियायाणे उगवण क्षमता तपासणे ,बीबीएफ किंवा  टोकन पद्धतीने लागवड करणे . तसेच शंकी गोगलगायीचे व्यवस्थापन व पिवळा मोझॅक नियंत्रण , हुमनी नियंत्रण,कडधान्य तुर मुग ,उडीद पिक क्षेत्रात वाढ करावी.एमईआरजीएस व भाऊसाहेब फुंडकर फळबाग  लागवड लाभार्थी  यादी करण्यात आली.त्याचबरोबर शेततळे या बाबीसाठी व प्रात्यक्षिक बियाणे व प्रमाणित बियाणे  सर्व शेतकरी , एससी लाभार्थी यांना महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन करण्यास सांगितले.  शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन श्री. डी. डी. सरवदे ,मंडळ कृषी अधिकारी ,नळदुर्ग  व श्री . डी. पी  बिराजदार, कृषि पर्यवेक्षक,श्री. आर. एन .मते ,कृषी सहाय्यक , निलेगाव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गावातील सरपंच , ग्रामपंचायत सदस्य व गावातील शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.