Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कृषी विभागाच्यावतीने हंगरगा येथे खरीप पूर्व प्रशिक्षण

कृषी विभागाच्यावतीने हंगरगा येथे खरीप पूर्व प्रशिक्षण                           


जळकोट , प्रतिनिधी दि .१५(मेघराज किलजे)


जळकोट येथून जवळ असलेल्या हंगरगा (नळ ) येथील ग्रामपंचायत कार्यालयात तुळजापूर कृषी विभागाच्या  नळदुर्ग मंडळ कार्यालय अंतर्गत खरीप हंगाम - २०२४  शेतकऱ्यांना पूर्वतयारी करता यावी. यासाठी कृषी विभागाच्यावतीने    खरीप पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.  
           हंगरगा (नळ) येथे खरीप हंगाम पूर्व बैठक आयोजित करण्यात आली होती.  या प्रशिक्षण कार्यक्रमात  प्रामुख्याने माती नमुने काढणे , जमिनी नुसार वाणांची निवड करणे,बीज प्रक्रिया, घरगुती सोयाबीन बियाणे  उगवण क्षमता तपासणे ,बीबीएफ किंवा  टोकन पद्धतीने लागवड करावी.  तसेच शंकी गोगलगायीचे व्यवस्थापन व पिवळा मोझॅक नियंत्रण , हुमनी नियंत्रण,कडधान्य तुर ,मुग, उडीद पिक क्षेत्रात वाढ करावी, एमआरईजीएस व भाऊसाहेब फुंडकर फळबाग  लागवड मार्गदर्शन करण्यात आले. त्याच बरोबर शेततळे या बाबीसाठी व प्रात्यक्षिक बियाणे व प्रमाणित बियाणे  सर्व शेतकरी एससी लाभार्थी यांना महा डीबीटी पोर्टलवर ऑनलाईन करण्यास सांगितले. शेती विषयक योजनेबाबत  सविस्तर मार्गदर्शन नळदुर्ग मंडळ कृषी कार्यालयाचे असे पर्यवेक्षक श्री. डी . पी. बिराजदार हंगरगा ( नळ) चे व कृषी सहाय्यक श्री . जी. एस. कांबळे  यांनी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी  सरपंच अतुल कलशेट्टी , उपसरपंच मोहन चव्हाण, माजी उपसरपंच दयानंद चौगुले, ग्रामसेवक ए . जी.पाटील,सदनशील शेतकरी प्रवीण चौगुले, ग्रामपंचायत सदस्य अंबादास घोडके , सिद्दिक पटेल, चंद्रकांत पाटील, वसंत अपशेट्टी, गावातील शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.