पाण्यासाठी बोरवेल घेऊन संभाजींची जयंती साजरी
जळकोट, प्रतिनिधी दि.१९(मेघराज किलजे)
जळकोट येथून जवळच असलेल्या सलगरा(म.) येथील शंभूराजे प्रतिष्ठानच्यावतीने गावातील पाणीटंचाई दूर होण्यासाठी धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने होणारा अवांतर खर्च टाळून गावात एक बोरवेल घेऊन जयंती साजरी करण्यात आली.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शंभूराजे प्रतिष्ठान सलगरा( मड्डी) यांच्यावतीने गावातील पाणीटंचाई बद्दल पुढाकार घेऊन संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने डी.जे. ,डॉल्बी, फटाके अशाप्रकारे होणारा लाखोंचा खर्च टाळून बोरवेल घेण्यात आली. शंभुराजे प्रतिष्ठानचे या उपक्रमाबद्दल परिसरात कौतुक येत आहे. गावचे तंटामुक्त उपाध्यक्ष बालाजी सराटे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.