Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जगदगुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्य महाराज पादुका दर्शन सोहळा

जगदगुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्य महाराज पादुका दर्शन सोहळा 


        तुळजापूर, News धाराशिव आवाज दि.९


जगदगुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज दक्षिण पीठ नाणीजधाम यांच्या सिद्ध पादुका दर्शन व प्रवचन सोडण्याचे गुरूवारी दि.१४ रोजी तुळजापूर येथे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता धाराशिव रोडवरील अग्निशामक केंद्र पार्किंग मैदान येथे हा सोहळा पार पडणार आहे.या सोहळ्यासाठी तुळजापूर येथे जय तयारी झाली असून कार्यक्रमाच्या ठिकाणी भगवा ध्वज अडकवून मंडपाची पूजन करण्यात आले आहे. 
याप्रसंगी मराठवाडा उप पिठाचे सहपिट प्रमुख काकासाहेब वाणा रसे प्रोटोकॉल अधिकारी शिवाजी पाटील जिल्हा निरीक्षक साहेबराव आहेर,जिल्हा सेवा समितीचे जिल्हा अध्यक्ष संतोष केसकर, उत्सव समिती अध्यक्ष विजय भोसले,तुळजापूर तालुका अध्यक्ष दीपक मुळे हे कार्यक्रमासाठी परिश्रम घेत आहेत. तुळजापूर तालुक्यातील जास्तीत जास्त भाविकांनी या दर्शन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन तुळजापूर तालुकाध्यक्ष दीपक मुळे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.